बेळगाव शहरातील विणकर व मजुरांसाठी आ.अभय पाटील यांनी अधिवेशनात प्रश्न मांडला
l
बेळगाव शहरातील गरीब विणकर व मजुरांनी खरेदी केलेल्या अनधिकृत जमिनींना अधिकृत करून त्यांना मुलभूत सुविधा देण्याची मागणी आमदार अभय पाटील यांनी आज विधानसभेत केली.
बेळगाव शहरातील गरीब विणकर व मजुरांनी बॉण्ड पेपरवर खरेदी केलेल्या जमिनी अनधिकृत ठरवून मनपा किंवा बुडा त्यांना मूलभूत सुविधा देत नाहीत.
या प्रश्नी बेळगाव दक्षिणचे आ.अभय पाटील यांनी आज विधानसभेत आवाज उठवला.बॉण्ड पेपरवर खरेदी केलेल्या जमिनी अधिकृत करून त्यांना मूलभूत सुविधा देण्याची मागणी त्यांनी केली.
महसूल मंत्री आर. अशोकउत्तर देताना म्हणाले की,राज्यातील बांधकाम व्यावसायिकांनी फायद्यासाठी सरकारी नियमांची पायमल्ली करून केवळ बाँड पेपरच्या कराराद्वारे जमिनी विकून गरीब जनतेची फसवणूक केलीआहे, त्यामुळे सरकारला नुकसान झाले आहे.तरी
याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन राज्यात अशा अनधिकृत जमिनी नियमित करण्याची संधी दिली जाईल, असे ते म्हणाले.
आ. अभय पाटील यांनी हे काम लवकरात लवकर व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.