फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्या समाजकार्याची दखल..जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांच्याकडून कौतुक…
बेळगाव लाईव्ह : कोविड कालावधीपासून आजतागायत समाजातील अडलेल्या नडलेल्या अनेकांना मदतीचा हात देणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्या समाजकार्याची दखल बेळगाव जिल्हा प्रशासनाने घेतली असून त्यांच्या या कार्याचे जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी कौतुक केले आहे.
संतोष दरेकर आणि सहकाऱ्यांकडून होत असलेले कार्य हे जिल्हा प्रशासनासाठी सहकार्याचे असून समाजातील प्रत्येक घटकाची काळजी, गरजूंना आर्थिक आणि शैक्षणिक मदत, नागरी सुविधा सोडविण्यासाठी पुढाकार, गणेशोत्सव काळात जिल्हा प्रशासनाला लावलेला हातभार या सर्व गोष्टी कौतुकास पात्र आहेत, भविष्यात देखील जागरूक नागरिक म्हणून अशाच पद्धतीचे सहकार्य मिळावे, असा उल्लेख जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांनी दिलेल्या कौतुकपत्रात करण्यात आला आहे.