बस फ्री आणि आत्ता ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील रिक्षांचे मीटर डाऊन….

बस फ्री आणि आत्ता ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील रिक्षांचे मीटर डाऊन….

बेळगाव :

अगोदरच कर्नाटक सरकारने महिला प्रवाश्यांना बस फ्री करून रिक्षा ,खासगी बसेस आणि टॅक्सी चालकांना फटका दिला असून आत्ता दसऱ्याची भेट म्हणून रिक्षावाल्यान मीटर सक्ती करण्यात येणार आहे .

ऑक्टोबर महिन्यापासून बेळगाव शहरातील रिक्षांना मीटरसक्ती लागू करण्यात येईल त्याचबरोबर मर्यादेपेक्षा जास्त विद्यार्थी रिक्षातून ने- आण करणाऱ्या रिक्षाचालकांचा वाहन परवाना देखील रद्द करण्यात येईल अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

आजपर्यंत वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनधारकांचा वाहन चालविण्याचा परवाना रद्द केल्याचा तपशील सादर करण्याच्या सूचना प्रादेशिक परिवाहन मंडळाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा पोलीस जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिल्या. दिवसेंदिवस रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती उपाययोजना करणे आवश्यक आहे. मालवाहू वाहनात मर्यादेपलीकडे मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर नियंत्रण ठेवण्यात यावे तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तसेच वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी त्याचप्रमाणे वाहनांची सर्व कागदपत्रे योग्य पद्धतीने तपासण्यात यावी अशा सूचना गुळेद यांनी यावेळी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ‘यांची’ चमकदार कामगिरी
Next post फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर यांच्या समाजकार्याची दखल..जिल्हाधिकारी मोहमद रोशन यांच्याकडून कौतुक .