साहित्य लेखन कार्यशाळेचे २ ऑक्टोबर रोजी आयोजन…
बेळगाव :
कावळेवाडी येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्थेतर्फे, बेळगुंदी बालवीर विद्यानिकेतन मध्ये २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.०० वाजता साहित्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे
या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक प्रा डॉ चंद्रकांत पोतदार, प्रा डॉ चंद्रकांत वाघमारे, प्रा.सौ.मानसी दिवेकर कोल्हापूर हे ‘साहित्य लेखन कसे करावे’, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्रेमानंद गुरव हे लाभणार आहेत तर, उद्घाटक प्रताप सुतार,म.गांधी फोटो पूजन विजया नाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. स्वागताध्यक्ष शंकर चौगले, तसेच सहभाग प्रमाणपत्र वितरण धनाजी मोरे,के.आर.भाष्कळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
या साहित्य लेखन कार्यशाळेसाठी साहित्यप्रेमी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन साहित्यविषयक अभिरुची जोपासावी असे आवाहन वाय पी नाईक, नामदेव मोरे, सूरज कणबरकर, कोमल गावडे यांनी केले आहे . नाव नोंदणी करण्यासाठी वाय. पी. नाईक (९४२०२०४१०५) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.