येळ्ळूर येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेला ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी भरत मासेकर यांनी भेट दिली.
बेळगाव :
येळ्ळूर येथील पशुचकित्सालय दवाखान्याला लागुन असलेल्या सरकारी मराठी प्राथमिक शाळा येळ्ळूर येथे या शाळेतील मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी ग्रामपंचायत अध्यक्षा सौ लक्ष्मी भरत मासेकर ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील. कलापा मेलगे पाटील.यांनी भेट दिली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका करलेकर टीचर यांनी शाळेच्या समस्ये बदल माहिती देताना काही समाजकंटका कडून शाळेच्या वर्गखोल्याची व पाण्याच्या टाकीची नासधूस केली जाते तसेच शाळेच्या पटसंख्ये विषयी माहिती दिली .
यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा लक्ष्मी मासेकर यांनी या परिसरात C.C.T.V camera बसवून या by प्रकारावर आळा घालण्यात येईल असे सांगितले यावेळी शाळेच्या SDMC अध्यक्षा धामणेकर. सदस्या टक्केकर. समाजसेवक यलुपा पाटील. सोमनाथ मजकूर व शाळेचे शिक्षक उपस्थित होते.