आमदार अभय पाटील यांनी कोल्हापूर प्रवासी प्रभारी म्हणून घेतली पहिली बैठक.
कोल्हापूर:
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांसह ,भाजप कोल्हापूर कार्यालयात ,कोल्हापूर प्रवासी प्रभारी म्हणून बेळगाव दक्षिण चे आमदार अभय पाटील यांनी पहिली बैठक घेतली.या बैठकीला खासदार श्री धनंजय महाडिक आणि 10 विधानसभा मतदार संघातील पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 25 नेत्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये आमदार श्री.अभय पाटील यांची निवड करण्यात आली असून भाजप अध्यक्ष श्री.जे.पी.नड्डा यांनी आमदार श्री.अभय पाटील यांच्यावर कोल्हापूर जिल्ह्याचे प्रवासी प्रभारी म्हणून 10 मतदारसंघांची जबाबदारी सोपवली आहे.
बेळगांव दक्षिण मधून चवथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले श्री.अभय पाटील यांनी यापूर्वी संपूर्ण छत्तीसगड राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी संपूर्ण तेलंगणा राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले आहे.
त्यांच्या नेतृत्वाखाली, संपूर्ण तेलंगणा राज्यात भाजपाला अभूतपूर्व यश मिळाले आहे. हे संपूर्ण यश लक्षात घेऊन आमदार श्री.अभय पाटील यांच्यावर चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करविर, कोल्हापूर उत्तर,शाहूवाडी हातकणंगले, इचलकरंजी आणि शिरोळ या मतदारसंघाची जबाबदारी देऊन त्यांची प्रवासी प्रभारी म्हणून निवड करण्यात आली आहे.