आ.अभय पाटील यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून सुंदर आणि अनोखा उपक्रम:2700 झाडांना रंग….
बेळगाव : प्रतिनिधी
बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त निधीतून अनेक विकासकामे राबविण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे विकास केंद्रीभूत मानून चालणाऱ्या, बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील, बेळगांवचे सौंदर्य वाढवण्यातही प्रयत्नशील आहेत. मग ते सरकारच्या निधीतूनचं नाही तर ते आपण स्वतः पुढाकार घेवून करतात .
गुरुवारी सकाळी काँग्रेस रोडवरील रस्त्यालगतच्या झाडांवर चित्रे रंगवून सामाजिक संदेश उपक्रमाला सुरुवात करण्यात आली.विकासकामांमध्ये नेहमीच अग्रेसर असणारे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी आता आपल्या मतदारसंघाचे सौंदर्यीकरण करण्याचा नवा उपक्रम सुरू केला आहे.
रस्त्याच्या कडेला सुमारे 2700 झाडांवर चित्रे रंगवून सामाजिक व प्रबोधनात्मक संदेश दिला जाईल.
.यावेळी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव दक्षिण मतदारसंघात रस्त्यांच्या कडेला सुमारे 2700 झाडे आहेत.या झाडांवर रासायनिक मुक्त रंगांचा वापर, लहान मुलांसाठी व्यंगचित्रे, तसेच अनेक विषय घेऊन आम्ही सामाजिक संदेश देणार आहोत.आजपासून या कामाला सुरुवात केली.पाणी वाचवा पर्यावरण वाचवा, स्वच्छतेचा संदेश या चित्रांतून देणार आहोत.
हे सर्व काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होऊन बेळगावच्या सौंदर्यात आणखी भर पडेल, असे ते म्हणाले.