इंनरव्हील कडून भाग्यनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था
बेळगाव : प्रतिनिधी
भाग्यनगर परिसरात फिरण्यासाठी ये-जा करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी बाकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तिसरा क्रॉस भाग्यनगर येथे ही सेवा उपलब्ध झाली आहे. इनरव्हील क्लब ऑफ बेळगाव संस्थेच्या पुढाकाराने ही सुविधा देण्यात आली आहे.
याचे उद्घाटन बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभ गुरुवारी क्लबच्या डिस्ट्रीक्ट चेअरमन महानंदा चंदरगी यांच्यासह इनरव्हील क्लब पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. क्लबच्या अध्यक्षा शालिनी चौगुले आणि सचिव पुष्पांजली मुक्कण्णावर यांनी या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी नगरसेवक अभिजित जवळकर यांच्यासह या भागातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. त्यांनी आ. अभय पाटील यांचा गौरव केला.