अभय पाटील यांच्या पुढाकाराने ई-सायकल आणि ई-बाईक प्रवास सुविधा कार्यान्वित केल्या
बेळगाव प्रतिनिधी
आजकाल वाढती वाहनांची वाहतूक सर्वसामान्यांना त्रासदायक ठरत आहे. शिवाय पार्किंगची समस्या , या दोन्ही समस्या सोडवू शकणारी ई-सायकल आणि ई-बाईकसाठी प्रवास सुविधा आता उपलब्ध आहे.ऑनलाइन अॅपद्वारे (yaana) नागरिकांना या सुविधेचा लाभ घेता येईल.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सुरू केलेल्या या अभिनव योजनेचा शुभारंभ शुक्रवारी करण्यात आला.या संदर्भात आ. अभय पाटील म्हणाले, पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक एकूण 3 प्रकारचे e बाईक वाहने असून.नागरिकांना माफक दरात सायकली भाड्याने मिळण्याची व्यवस्था केली आहे. बेळगाव दक्षिण मतदारसंघात अशी सुमारे 20 सर्व्हिस पॉइंट सुरु करण्यात आली आहेत.
ई पेमेंट पद्धतीने भाडे भरण्याची सुविधा आहे. भाड्याचे दर पत्रकही लावलेली आहेत. पब्लिक बायसिकल, ई बायसिकल आणि ई बाईक या तिन्ही प्रकारच्या प्रत्येकी 100 म्हणजेच एकूण 300 ई बाईक असून, जनतेचा प्रतिसाद पाहून त्यांची संख्या दुपटीने वाढविण्यात येईल. पर्यावरणाचे रक्षण करण्यासह वेळ आणि पैसे वाचविण्यासाठी याची नागरिकांना मदत होईल.
या संदर्भात आ.अभय पाटील यांनी बेळगाववासीयांना याची माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.यावेळी स्थानिक नगरसेवक राहुल भटकांडे,जयंत जाधव ,मनपा आणि स्मार्टसिटीचे अधिकारी उपस्थित होते.