बुधवारी भाजपा तर्फे बाईक रॅली.
बेळगाव :
बेळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री, जगदीश शेट्टर हे बुधवार 27 मे रोजी सकाळी हिरे बागेवाडी टोलनाक्या वरून बेळगाव येथे येणार असून भाजप कार्यकर्ते त्यांचे स्वागत करणार आहेत.
सकाळी त्यांचे हिरे बागेवाडी टोलनाक्या वरून लोकसभा मतदारसंघात आगमन होऊन ,सकाळी 10.30 वा .किल्ला दुर्गादेवी मंदिरात पूजेचा कार्यक्रम, त्यानंतर दुचाकीस्वार रॅली सोबत तेथून न्यायालयाच्या आवारातील सांगोली रायण्णा मूर्तीला पुष्पहार अर्पण करून, चन्नम्मा सर्कल, येथील चन्नम्मा राणी मूर्तीला पुष्पहार अर्पण करतील.
कपालेश्वर ओवरब्रिज मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, महात्मा पुळे मार्गे गोवेस येथील जगज्योती बसवेश्वरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यानंतर महानगर कार्यालया पर्यंत बाईक रॅली काढण्यात येणार आहे.