माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आज रात्री बेळगावात .
बेळगाव-
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी बेळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवल्याच्या मुद्द्यावरून भाजपनेच सुरू केलेल्या गो बॅक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील असंतुष्ट नेत्यांना शांत करण्यासाठी माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा आज रात्री बेळगावात येत आहेत.
येडियुरप्पा हे बेळगावातील भाजपचे आमदार, माजी आमदार आणि स्थानिक भाजप नेत्यांची बेळगावातील पंचतारांकित हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक घेणार असल्याचे कळते.
“गो बॅक शेट्टर” असा सोशल मीडियावर प्रचार करून आपला रोष व्यक्त करणाऱ्या बेळगावातील स्थानिक नेते आणि भाजप कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी येडियुरप्पा आज बेळगावात येणार आहेत.
आज रात्री ते बेळगावात येणार असून सकाळी हॉटेल UK 27 येथे ते बोलणी बैठक घेणार असल्याची माहिती आहे. जगदीश शेट्टर उद्या बुधवारी बेळगावात येणार आहेत, येडियुरप्पा जगदीश शेट्टर यांना सोबत आणणार की वेगळे, हे पाहावे लागेल.