हेडा सिरॅमिक्स येथे ‘जग्वार’च्या नव्या उत्पादनाचे प्रक्षेपण

हेडा सिरॅमिक्स येथे ‘जग्वार’च्या नव्या उत्पादनाचे प्रक्षेपण

 बेळगाव:

जग्वार या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या कर्नाटकातील पहिल्या कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स या उत्पादनाचा शुभारंभ आज गुरुवारी खानापूर रोड टिळकवाडी येथील हेडा सिरॅमिक्स येथे करण्यात आला.

लाइटिंग सोल्युशन्स या उत्पादनाच्या शुभारंभ कार्यक्रमास हेडा सिरामिक्सचे विजय हेडा, क्रेडाई संघटना बेळगावचे अध्यक्ष बांधकाम व्यावसायिक दीपक गोजगेकर, जग्वार कंपनीचे प्रतिनिधी एम टी हेगडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे दीपक गोजगेकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलांत तसेच फीत कापण्याद्वारे जग्वार कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्सच्या नव्या शोरूमचे उद्घाटन करण्यात आले.

क्रेडाई अध्यक्ष दीपक गोजगेकर म्हणाले की, बेळगाव येथे प्रत्येक मोठ्या प्रकल्पांमध्ये  जग्वार कंपनीच्या उत्पादनांचा वापर होतो. मात्र या उत्पादनांच्या खरेदीसाठी यापूर्वी  बेंगलोर वगैरे ठिकाणी जावे लागत होते. मात्र आता आपल्या बेळगावात हेडा सिरामिक्समध्ये जग्वार कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स उपलब्ध झाली आहेत. तेंव्हा शहरवासीयांसह माझ्या समस्त व्यावसायिक बांधवांनी याचा लाभ घ्यावा.

जग्वार कंपनीचे दक्षिण भारत प्रमुख एम टी हेगडे हेगडे यांनी सांगितले की, कम्प्लीट बाथरूम अँड लाइटिंग सोल्युशन्स ही जग्वार ग्रुपची नवी संकल्पना आहे. या संकल्पने अंतर्गत स्नानगृहात सॅनिटरी वेअरपासून फ्लॅशिंग सिस्टीम, हॉट वॉटर, शॉवर एनक्लोझर्स, वेलनेस प्रॉडक्ट आदी सर्व सुविधा उपलब्ध असतील. जग्वारची उत्पादने वैश्विकदृष्ट्या एक उत्तम ब्रँड म्हणून मानली जातात. जग्वार ग्रुप गेल्या दोन दशकापासून बेळगावातील हेडा सिरामिक्स सोबत कार्यरत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर “रेस्टॉरंट ऑन व्हील्स”
Next post अखिल भारतीय मानवी हक्क आणि सामाजिक न्याय मिशन कडून झिल्लाधिकरीला निवेदन