गोगटे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमादरम्यान कन्नड ध्वज घेऊन नाचल्यामुळे एका विद्यार्थ्याला काही लोकांनी मारहाण केली.त्यामुळे महाविद्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शांत केले आणि परिस्थिती समजावून सांगितली.
घटनेची माहिती मिळताच डीसीपी रवींद्र गडादी व इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली.मात्र याबाबत विद्यार्थ्यांनी तक्रार केली नाही.
महाविद्यालयाच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी कन्नड ध्वज घेवून कन्नड गाण्यावर नृत्य केले.अन्य एका विद्यार्थ्याने संतप्त होऊन नाचणाऱ्या विद्यार्थ्याला मारहाण केल्याचे वृत्त आहे.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना बोलावून चौकशी केली जात आहे.तपास सुरू ठेवण्यात आल्याचे रवींद्र गडादी यांनी सांगितले.
20-25 वर्षांपूर्वी बेळगावात सातत्याने घडत असलेल्या अशा घटनेची पुन्हा पुनरावृत्ती होणे चिंताजनक आहे.