वॉर्ड क्र.58 माजगाव मध्ये रहिवासी वॉर्ड समिती स्थापन करण्याचा एकमताने निर्णय
बेळगाव:
बेळगाव महापालिका प्रभाग समिती निर्मिती आणि जनजागृतीसाठी रविवारी शहरातील वॉर्ड क्र.58 मजगाव येथील विठ्ठल-रुक्माई मंदिर मध्ये जनाग्रह एनजीओ संस्था आणि मजगाव मधील रहिवाशांची बैठक पार पडली. यावेळी मजगाव पंचकमिटीचे अध्यक्ष शिवाजी पट्टण, आकाश मजूकर ,श्रीमती सारिका बोभाटे आणि राणी चन्नमनगर प्लॉटर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्रमोद गुंजीकर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. प्रभाग समितीची माहिती अतिशय चांगल्या पद्धतीने लक्षात आणून दिल्याबद्दल, येथील रहिवाशांनी संस्थेच्या गौरी गजबर यांचे आभार मानले. या कार्यक्रमात वॉर्ड58 मधील रहिवाशांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून प्रभाग समिती स्थापन करण्याचे एकमताने मान्य केले.