रविवार पेठ गणेशोत्सव मंडळाची नवी कार्यकारिणी
बेळगाव :
येथील रविवार पेठ सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांची बैठक 26 जून रोजी संपन्न होऊन आगामी वर्षासाठी नवीन कार्यकारणी नियुक्त करण्यात आली. मानद अध्यक्ष- प्रकाश बाळेकुंद्री, अध्यक्ष- बाळाप्पा कगणगी, उपाध्यक्ष- व्यंकटेश हिशोबकर,राजशेखर चोण्णद, दिगंबर तेंडुलकर, चेतन हिडदूग्गी, खजिनदार- के गणेश भट, सहखजिनदार -अंकुर पटेल, सेक्रेटरी- वीरेश ऊळवी, सह सेक्रेटरी- विशाल उंडाळे यांची निवड करण्यात आली. तसेच 1991 पासून गेली 32 वर्षे सातत्याने अध्यक्षपद भूषविलेल्या भानुदास उर्फ दादा आजगावकर यांनी प्रकृती आसवासथामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असून त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा सर्वांनी गौरव केला.