नगरसेवक आनंद चव्हाण यांच्या पुढाकारामुळे वॉर्ड क्र.44 येथील नाला सफाईचे काम सुरू.
बेळगाव:
वॉर्ड क्र.44.येथे असलेला नाला कित्येक वर्षांपासून स्वच्छ केला नव्हता. नगरसेवक आनंद चव्हाण यांनी पुढाकार घेवून आ.अभय पाटील यांचा ध्यानात आणून दिले. आ.अभय पाटील यांचा मार्गदर्शनात आज सोमवार 3 जूलैला मनपा कर्मचारी यांना घेवून सफाईचा काम सुरू केले गेले.
नगरसेवक आनंद चव्हाण यांनी सांगितले की लोटस काउंटी मागचा नाला , मणियार लेआउट मागचा नाला ,गजानन महाराज नगर मुख्य रत्यावरचा नाला.मधुबन वसतिगृह नाल्याशेजारी असलेले नाला स्वच्छ केला जाईल आणि पावसाळ्यात जे नाला भरून पाणी रत्यावर येत होतं ते आता ते होणार नाही . नागरिकांनी कचरा नाल्यात फेकूनये असे आवाहन नगर सेवकांनी केले आहे.
नाला स्वच्छ्ता चे काम सुरु झाल्याने वॉर्ड क्र.44 येथील रहिवाश्यांनी समाधान व्यक्त केले आणि नगर सेवक आनंद चव्हाण यांचा कौतुक केले आणि आभार मानले .
या वेळी महानगर पालिकेचे अभियंता आरोग्य निरीक्षक कलावती आदिमनी.पर्यवेक्षक परशराम चव्हाण.भाजपचे सदस्य देवदास ,जाधव राजन चव्हाण,मंदार उचगावकर उपस्थित होते