आमदार श्री.अभय पाटील यांच्या “हॅटट्रिक” विजय निमित सत्कार
बेळगाव:
बेळगाव दक्षिण भागातून निवडून आलेले विद्यमानआमदार अभय पाटील यांचा सत्कार करण्यात आला.नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव दक्षिण मतक्षेत्रामधून पुन्हा एकदा विजय मिळवून या क्षेत्रात तिसऱ्यांदा आमदार पदी विराजमान झाल्या निमित्त गुरुवार दिनांक 01 जून रोजी वार्ड क्रं.16 च्या वतीने आ.अभय पाटील यांचा जाहीर सत्कार गुजरात भवन ,शास्त्री नगर येथे करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर सत्कार मूर्ती आ.अभय पाटील सोबत ,रमेश लढद, आणि नगरसेवक राजु भातकांडे, तसेच वार्ड क्र. 16 मधील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. भारती नेगिन्हाल यानी सुञसंचलन केले व सर्वांचे आभार मानले.
आ.अभय पाटील यांनी त्यांना पुन्हा एकदा निवडून दिल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे आणि लोकांचे आभार मानलें