दूर्धर आजाराची झुंज देणाऱ्या सर्वमचा दुर्दैवी मृत्यू
बेलगाम :
जन्मता दुर्धर आजाराशी झुंज देणाऱ्या लक्ष्मी रोड शहापूर येथील सर्वम मंगेश बाळेकुंद्री (वय ३) याचा गुरुवारी दुर्दैवी मृत्यू झाला. सर्वम हा जन्मताच स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी हा आजार होता या आजाराला उपचारासाठी कोट्यावधी रुपयाची गरज होती या खर्चासाठी बेळगाव येथील जनतेने आर्थिक मदतीतून हातभार लावला होता मात्र या दुर्धर आजारात सर्वांचा गुरुवारी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
स्पायनल मस्कुलर ॲट्रॉफी हा आजारावर बेंगलोर येथील बँप्टीस हॉस्पिटलसह अशा अनेक ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून उपचार सुरू होते. या आजारातून सर्वमला बरं होण्यास 16 कोटी रुपयाच्या किंमतच्या इंजेक्शनची गरज होती हे इंजेक्शन यूएस मध्ये मिळते हे इनपुट ड्युटीसह त्या इंजेक्शन ची किंमत 20 कोटी रुपये पेक्षाही जास्त होती.
हे इंजेक्शन देण्याची घरच्या लोकांची परिस्थिती नसल्याने यासाठी बेळगाव आतील इतर संस्था संघटना या लोकांनी मदत ही केली होती. असे असून देखील यातून सर्वमला फायदा न होता अखेर गुरुवार दिनांक 25 रोजी त्याचा मृत्यू झाला.