महिला कलाकारांसाठी मेकअप करणार महिला मेकअप आर्टिस्ट : आ. अभय पाटील यांचा स्तुत्य उपक्रम.
बेळगांव:
बेळगांवचा शिवजयंती उत्सव म्हणजे एक मानाचा सोहळा समजला जातो. जिवंत चित्ररथ देखाव्यातून साकार होणारे शिवचरित्र पाहण्यासाठी महाराष्ट्र, गोवा, निप्पणी,उत्तर कर्नाटकातून लोकांची अलोट गर्दी होते अनेक चित्ररथ असल्याने आणि प्रत्येक चित्ररथावर बरीच पात्रे असल्याने, त्या सर्व पात्रांचा मेकअप होऊन चित्ररथ मिरवणुकीला सुरूवात होण्यास खूप विलंब होतो.
यावर तोडगा म्हणून मागील आठ वर्षां पासून आमदार अभय पाटील हे मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथून जवळ जवळ चाळीस व्यावसायिक मेकअप मन ना आमंत्रित करत आहेत. आणि याला उत्तम प्रतिसाद ही लाभत आहे. या उपक्रमामुळे चित्ररथ मिरवणूक काही अंशी लवकर सुरूहोण्यास हातभार लागतोय.
यावर्षीही आमदार अभय पाटील यांनी हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला असून 27 मे. 2023 रोजी दुपारी ३ ते ६ या वेळेत मिलेनियम गार्डन, शुक्रवार पेठ,टिळकवाडी, बेळगांव येथे हे मेकअपमेन उपलब्ध रहाणार असून चित्ररथ देखाव्यातील पात्रांना विनामूल्य मेकप (मेकअप साहित्यासह) केला जाणार आहे.
यावेळी खास महिला कलांकरासाठी मुंबईहुन महिला मेकअप आर्टिस्ट ना बोलावण्यात येथ आहे .तेव्हा जास्तीत जास्त शिवजयंती उत्सव मंडळांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
इच्छुक मंडळानी या निवेदनासोबत दिलेला अर्ज भरून दिनांक 25 मे 2023 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत किरण स्वीट मार्ट कोरे गल्ली आणि संगीता स्वीट मार्ट नाथ पै सर्कल येथे आणून द्यावेत. त्याप्रमाणेच कुणाला काही सुचना करावयाच्या असतील किंवा मेकअप व्यतिरिक्त आमच्याकडून काही गोष्टी अपेक्षित असतील तर खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावर 25 मे. 2023 पर्यंत संपर्क साधावा आम्हाला शक्य असतील त्या तुम्ही सुचविलेल्या सुचना अमलात आणण्याचा प्रयत्न करू. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नितिन जाधव – 9844571445 जितेंद्र देवण – 9844276116 प्रविण पिळणकर – 9035788707 संदीप जाधव 9886361998 राजू भातकाडे – 9242714507