बेंगळुरू :
राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार असून 24 मंत्री शपथ घेणार आहेत.राज्य मंत्रिमंडळात 34 जणांचा समावेश होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत 10 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज आणखी 24 जण शपथ घेणार आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा सकाळी 11.30 वाजता राजभवनात होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी यादी अंतिम केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार लक्ष्मी हेब्बाळकर, ईश्वर खंड्रे,शिवानंद पाटील, शरणबसप्पा दर्शनापुर, डॉ. एच.सी.महादेवप्पा, शिवराज थांगडगी, बैरथी सुरेश, कृष्णा बैरेगौडा, एस. एस. मल्लिकार्जुन, मधु बंगारप्पा, डॉ.शरणप्रकाश पाटील, के. एन. राजण्णा, दिनेश गुंडुराव, डी. सुधाकर, सी. पुट्टरंगशेट्टी, मंकलू वैद्य, एच. के. पाटील, एम. पी. नरेंद्रस्वामी, एम. सी. सुधाकर, बी. नागेंद्र, के. व्यंकटेश, चालुवरायस्वामी, रुद्रप्पा लमाणी, संतोष लाड यांचा मंत्रिमंडळात सामील होण्याची शक्यता आहे. तर माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे, बसवराज रायरेड्डी, विनय कुलकर्णी, लक्ष्मण सवदी, बी. के. हरिप्रसाद यांची संधी हुकण्याची शक्यता आहे.