वडगाव परिसरात अभय पाटील यांना भरघोस पाठींबा
बेळगाव :
बेळगाव शहर दक्षिण मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांनी शुक्रवारी सायंकाळी वडगाव परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला.
अभय पाटील यांच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद मिळत असून मतदारांच्या गाठीभेटी व थेट संपर्कावर त्यांनी भर दिला आहे. ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. तसेच या स्वागत सोहळ्याला मिरवणुकीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
त्यामुळे हा प्रचार लक्षवेधी ठरला होता. शुक्रवारी सायंकाळी अन्नपूर्णे मंदिरापासून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. संभाजीनगर,येरमाळ रोड, पाटील गल्ली कारभार गल्ली, मंगाई मंदिर परिसर, विष्णू गल्ली, धामणे रोड, वझे गल्ली, वाडा कंपाऊंड, नाझर कॅम्प, रेणुका हॉटेल, रामदेव गल्ली, सोनार गल्ली, दत्त गल्ली पासून दत्त मंदिरापर्यंत प्रचार फेरी काढण्यात आली. जागोजागी अभय पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. प्रचार फेरीत महिलांसह वृद्धांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.