अमित शाह आणि डॉ.प्रमोद सावंत यांच्या तुफानी रोड शो मुळे अभय पाटील यांची विजयाकडे घोडदौड स्पष्ट.
बेळगाव :
बेळगाव दक्षिण विभागात भाजपचे उमेदवार अभय पाटील यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. त्यांच्या या प्रचारकार्याची रणधुमाळी चांगलीच गतीमान झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शो नंतर या घोडदौडीचे चित्र अधिकच स्पष्ट झाले आहे. तसेच अभय पाटील यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठविण्याचा निर्धार प्रकट झाला आहे.
अमित शहा यांनी रोड शो मध्ये सहभागी होवून मतदारांना भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले. विकास आणि मूलभूत सुविधांची पूर्तता ही आजच्या काळाची गरज आहे. त्यामुळे भाजपने अशा दूरदृष्टी असलेल्या उमेदवारांना संधी दिली आहे.
अभय पाटील यांनी केलेले विकासात्मक कार्य मतदारांना चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहावे आणि त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन केले.
यावेळी हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या नागरिकांनी त्यांना आपला पाठिंबा प्रकट केला. या रोड शोची सुरुवात वडगाव पिंपळकट्टा येथून झाली. वडगाव आणि शहापूर मार्गांवरून फिरून शिवचरित्र शहापूर येथे रोड शो ची सांगता झाली.