बेळगाव :
गोकाक आणि यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघाचे निरीक्षक असलेले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वार्ताभवनमध्ये मीडिया मॉनिटरिंग युनिट सुरू केले आहे. अधिकारी एस.मलारविन्हा यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची आणि कामकाजाची पाहणी केली.
इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये पसरलेल्या बातम्यांवर लक्ष ठेवले पाहिजे. पेड न्यूज किंवा जाहिरात असल्यास संबंधित खर्च उमेदवारांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करावा, असे निर्देश त्यांनी दिले.याशिवाय आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या बातम्या आल्यास त्या संबंधित मतदारसंघातील आदर्श आचारसंहिता नोडल अधिकारी व निवडणूक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्याव्यात अशी सूचनाही त्यांनी केली.माहिती विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर यांनी जिल्हा माध्यम निरीक्षण युनिटच्या कार्याची माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व अठरा मतदारसंघातील उमेदवारांकडून निवडणुकीच्या जाहिराती आणि आचारसंहिता भंगावर लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गोकाक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी गीता कौलगी आणि यमकनमर्डी मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी बलराम चव्हाण तसेच मीडिया सर्व्हिलन्स युनिटच्या अधिकारी श्रीदेवी नागनूर, सुनील पाटील, होलेप्पा नायक, आर. एस. वलीशेट्टी, लक्ष्मण तलवार, महांतेश पट्टारा, अरुण नेसरगी आदी यावेळी उपस्थित होते.