बेळगाव :
बेळगाव दक्षिण मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अभय पाटील यांनी देखील आपल्या कार्यकर्त्यांसमवेत छत्रपती शिवाजी उद्यानात शिवजयंती साजरी केली. तसेच शिव पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी घोषणांचा गजर केला.
सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ यांच्यावतीने आज शनिवारी परंपरेनुसार छ. शिवाजी उद्यानातील शिवरायांच्या मूर्तीचे पूजन करून श्री शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री शिवजयंती निमित्त आज शनिवारी सकाळी सर्वप्रथम धर्मवीर संभाजी चौक येथे विविध गडकिल्ल्यांवरून आलेल्या शिवज्योतींचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शहापूर छ. शिवाजी उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनारूढ मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले.