येडीयुरापा प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात;सुदैवाने जीवितहानी टळली

येडीयुरापा प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरला अपघात;सुदैवाने जीवितहानी टळली

कलबुर्गी:

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्या हेलिकॉप्टरला अपघात घडला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कलबुर्गी येथील जिवर्गी येथे ही घटना घडली.

येडीयुरप्पा ज्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते ते हेलिकॉप्टर हेलिपॅडवर येण्यापूर्वी सोसाट्याचा वारा आला.त्यामुळे परिसरातील कचरा हेलिपॅडवर पडल्यामुळे हेलिपॅड दिसेनासे झाले. पायलटने वेळीच प्रसंगावधान राखून हेलिकॉप्टर थोडा वेळ हवेतच फिरविले. वारा शांत झाल्यानंतर पोलीस व तेथील कर्मचाऱ्यांनी हेलिपॅड वरील कचरा साफ केला. हेलिकॉप्टरच्या पंख्यात प्लास्टिक कचरा अडकला असता तर मोठा अनर्थ घडला असता. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post कॅन्टोन्मेंट सीईओ विरोधात मनपाच्या सभागृहात आ. अभय पाटील यांची नाराजगी
Next post  आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या होळी मिलन कार्यक्रमाला तरुणाईचा उदंड प्रतिसाद.