कॅन्टोन्मेंट सीईओ विरोधात मनपाच्या सभागृहात आ. अभय पाटील यांची नाराजगी.
बेळगाव
बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी कॅन्टोन्मेंट यंत्रणेच्या असहकारा बद्दल जोरदार नाराजी व्यक्त केली. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या क्षेत्रातून बेळगाव शहरासाठी जलवाहिनी घालण्याकरिता अनुमतीची गरज आहे. मात्र कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सीईओनी याला अनुमती देण्यासाठी विलंब केलं आहे. याबद्दल आ. अभय पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
महानगरपालिकेच्या नूतन सभागृहाची पहिली सभा मंगळवारी पार पडली . या सभेमध्ये महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या पाणी समस्येवर जोरदार चर्चा करण्यात आली .यावेळी झालेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी आपल्या वर्गातील पाणी समस्येबाबत मुद्दे मांडले.
एल अँड टी कंपनीकडे पाणीपुरवठा सोपविल्यानंतर शहरासमोर अनेक समस्या उभ्या टाकल्या आहेत .याची गंभीर दखल घेऊन यामध्ये त्वरित बदल करण्यात यावा. अशी जोरदार मागणी करण्यात आली .
मनपाचे नूतन सभागृह अस्तित्वात आल्यानंतर या बैठकीचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. महापौर निवडीनंतर ही सभा घेण्यात आली आहे. महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील यांच्यासह नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी आणि अधिकारी वर्गाने चर्चेमध्ये नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.