आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या होळी मिलन कार्यक्रमाला तरुणाईचा उदंड प्रतिसाद.
बेळगाव
बेळगावच्या होळी उत्सवाला वेगळे वैभव मिळवून देणार्या होळी मिलन उत्सवाचे आयोजन व्हॅक्सिन डेपो मैदानावर करण्यात आले होते. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांच्या पुढाकाराने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाई रमल्याचे दिसून आले.
रंगांच्या फवारणीत रमलेल्या तरुणाईने उत्साहात रंगोत्सव साजरा केला. शहराच्या कानाकोपर्यातून आलेल्या तरुणांच्या थव्यांनी या मार्गावरील सर्व रस्ते भरून गेले होते. या उत्सवामध्ये प्रारंभी आ. अभय पाटील यांनी नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या.
पारंपारिक पद्धतीने जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्याची संधी बेळगावकरांनी पुरेपूर घेतली. विविध रंगांची उधळण करत मंगळवारी बेळगावकरांनी अभुतपूर्व उत्साहात रंगोत्सव साजरा केला. यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने युवा वर्गाच्या उत्साहाला उधाण आले. कोरड्या रंगाचा भरपूर मारा करत संगीताच्या तालावर जल्लोष करण्यात आला. रंगोत्सवासाठी बंधनाच्या चौकटी खुल्या झाल्यामुळे त्यात न्हाऊन निघण्याचा आनंद तरुणाईने घेतला.