नगरसेवक गिरीश धिंगडी यांच्या पुढाकाराने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
घेळगाव: प्रतिनिधी
आ.अभय पाटील ह्यांच्या मार्गदर्शनात आणि नगरसेवक गिरीश धोंघडी यांचा नेतृत्वात कर्नाटक दैवज्ञ आंग्ल माध्यम शाला परिसर व शास्त्रीनगर विभाग क्र. 914 येथे आज दि. 16 फेब्रुवारी रोजी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
50 हून अधिक शाळेतील विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये भाग घेवून उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.
या अभियानामध्ये विभागाचे कार्पोरेटर श्री. गिरीश धोंगडी, प्रमुख ए.ए.ई,श्री. हनमंत कलाडगी, कार्पोरेशन सॅनिटेशन इन्स्पेक्टर ,श्रीमती कलावती, सुपरवायझर श्री. गजानन महानगरचे वरिष्ठ व प्रमुख नागरिक श्री. सुशांत ढांगे,श्री. विनायक हवलान्नाचे श्री. नागेश पाटील, श्री. शिवाजी पाटील, तसेच कर्नाटक दैवज्ञ आंग्ल माध्यम शालेच्या व्यवस्थापन समितीतील मान्यवरांमध्ये श्री. लक्ष्मीकांत नेतलकर श्री. गुरुनाथ अनवेकर व मुख्याध्यापिका शो· गोपिका कदमव शिक्षकवृंद उपस्थित होते.
शास्त्रीनगरच्या महिला सखी तर्फे अभियानात सहभागी झालेल्यांना नाष्टा देण्यात आला. मा. गिरीश धोंगडी यांनी प्रेरणादायी भाषण करून अभियानात सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार मानले.