बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना उत्कृष्ट निवडणूक अधिकारी पुरस्कार प्रधान.
प्रतिनिधी
बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना उत्कृष्ट निवडणूक अधिकारी म्हणून गौरविण्यात आले.बुधवारी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांच्या हस्ते बंगळुरू येथील टाऊन हॉलमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.हा पुरस्कार भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केला आणि राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी मनोज कुमार मीना, बीबीएमपी आयुक्त तुषार गिरीनाथ आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी निवडणुकीसंदर्भातील सर्व कागदपत्रे तयार केली होती.जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या आकडेवारीनुसार मतदार व इतर सर्व कामे चांगल्या पद्धतीने पूर्ण झाली आहेत.त्यामुळे निवडणूक आयोगाने दखल घेत हा पुरस्कार दिला आहे.
या कार्यक्रमात जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर अधिकारी सहभागी झाले होते.यावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.