सन्मित्र महिला मंडळच्या वर्धापन कार्यक्रमाचा उद्घाटन अधक्ष्या अश्विनी नितिन जाधव ह्यांच्या हस्ते.
बेळगाव:
सन्मित्र महिला मंडळ,कोरे गल्ली, ह्यांचा वर्धापन दिनानिमित्त गल्लीतील लहान मुला-मुलींसाठी विविध स्पर्धा व महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ, तसेच कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण मराठी पारंपारीक कलेचा एक प्रकार ” मंगळागौरीचे खेळ” हा महिलांसाठी खास सांस्कृतीक कार्यक्रम, गुरुवार दिनांक 26 जान.रोजी सायंकाळी 5 वाजता कोरे गल्ली येथील गंगापुरी मठामध्ये आयोजीत केले होते.
महिला व लहान मुलां-मुलींसाठी स्पर्धा सकाळी 10-00 पासुन वेग वेगळ्या मनोरंजक खेळ,ओरीओ बिस्कीट बॅलेन्सींग,नॉन स्टॉप स्कीपींग (वेळ 1 मीनीट),बेस्ट आऊट ऑफ वेस्ट असे आयोजित केले होते.संद्याकाळी 5 पासुन सन्मित्र महिला मंडळ आयोजित स्पर्धा, महिलांसाठी (मंगळागौरीचे खेळ) सांस्कृतीक कार्यक्रम, बक्षीस समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू करण्यात आलं. महिला व लहान मुलामुलींनी मोठ्या संख्येने उपस्थिीत राहून उत्साने भाग घेवून कर्यरामाला उत्तम प्रतिसाद दिले.
दीप प्रज्वलन अधक्ष्या अश्विनी नितिन जाधव आणि अन्य कार्यकारी मंडळानी केले. उपाध्यक्ष शोभा चीगरे,आशा मुचंडी ,अल्का कडोलकर, आशा नेसरीकर, शोभा पाटील ,सुलोचना कडोळकर, रश्मी मोहिते, जयश्री शहापूरकर, सरिता पाटील नीता कुंडेकर, स्मिथा उचागावकर, रीना शिंदोलकर. गीता केरवाडकर,या सह गल्लितील महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या .