धर्मवीर संभाजी महाराजांच्या पुतळा उद्या लोकार्पण
बेळगाव:
बेळगावातील प्रमुख चौक असलेल्या धर्मवीर संभाजी महाराज चौकातील धर्मवीर संभाजी महाराजांच्य नूतनीकरण व सुशोभीकरण केलेल्या पुतळा व परिसराचा लोकार्पण सोहळा उद्या शनिवारी सायंकाळी आयोजित केल्याची माहिती आ. आंनेल बेनके यांनी दिली.
बेळगावात प्रतारमाध्यमांशी बोलताना अ. अनिल बेनके मणाले, छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन आहे. त्यानिमित्त उद्या सायंकाळी 6 ते 9चा दरामान पुतळा व रिसराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. केंद्रीय माहिती आयुक आणि ग्वाल्हेरच्या राजघ्राप्यातील माहूरकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय बेंगळूरच्या गोसावी मठाचे गराठा समाजाचे श्री श्री गंजुनाथ भारती त्वागीजी,खा. मांगला अंगडी, आ. अभय पाटील, माजी आ. संजय पाटील, निवृत्त मेजर जनरल देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. राज्यस्तरीय नेत्यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
मात्र उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा बेळगाव दौरा असल्याने वेळेची उपलब्ध पाहून येण्याचा प्रयत्न करण्याचे आकासन त्यांनी दिले आहे. भव्यदिव्य पद्धतीने हा सोहळ पार पाडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील गर्दानी खेळांचे पथक, सुमारे १५झके, घोडे आदींच्या सहभागाने शानदार समारंभात पुतळा परित्राचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
आ. बेनके पुढे न्हणाले,रात्रंदिवस परिश्रम करून वेगाने दर्जेदार पद्धतीने सुशोभीकरणाचे काम पूर्ण केले आहे. . यासाठी सुमारे ४० लाख खर्च आला आहे. एकंदर, सुशेगीकरण आणि नूतनीकरणकृत थर्मवीर संभाजी महाराजांच्या चौकातील गुतळा परिसरचे इतके दिवस रखडलेले काम पूर्ण होऊन लोकार्पण होत असल्याने समस्त बेळगावकरांमध्ये समाधान पसरले आहे.