हत्तरगीत बसला आग…..कोणतीही जीवितहानी नाही
बेळगाव
हत्तरगी : सरकारी बस मध्ये शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या
आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली मात्र सुदैवाने
कोणतीही जीवितहानी झाली नाही. बेळगाव कोल्हापूर
राष्ट्रीय महामार्गावर हत्तरगी जवळ गुरुवारी सायंकाळी
चारच्या दरम्यान ही घटना घडली.
अचानक बसला शॉर्ट सर्किट होऊन महामार्गावर राज्य
परिवहन विभागाच्या बसला आग लागली त्यामुळे हायवेवर
मोठ्या प्रमाणात ट्राफिक जाम देखील झाला होता.
दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव
घेत आग विझवली मात्र तोवर बस जळून खाक झाली
होती. सुदैवाने बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी
गावाच्या हद्दीत ही घटना घडली. यमकनमरडी पोलिसांनी
घटनास्थळी भेट दिली.