आ. अभय पाटील यांच्या नाश्ते पे चर्चा उपक्रमाचा जनते कडून स्वागत आणि कौतुक.
बेळगाव : प्रतिनिधी
नागरिकांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामूळे या त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी जनतेशी संवाद आवश्यक आहे.
आणि हिच महत्त्वाची गोष्ट लक्षात घेऊन बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी नाश्ते पे चर्चा हा अभिनव उपक्रम राबविला असून या उपक्रमाला विविध ठिकाणच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
गुरुवारी वॉर्ड क्र. 42, 43, 51, 52 आणि 57 या वॉर्डातील नागरिकांसाठी हा उपक्रम पार पडला. अनगोळ मधील आदिनाथ भवन येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिकांना देण्यात आलेल्या पूर्वसूचनेप्रमाणे लेखी तक्रारी देण्यात आल्या.
या समस्या जाणून घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी आ. अभय पाटील यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या. तसेच समस्या निवारणासाठी दक्ष राहण्याबाबत सुचित केले. नागरिकांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून सर्वत्र याची चर्चा सुरू आहे.
या उपक्रम संयोजनासाठी नगरसेवक अभिजीत जवळकर,श्रीशैल कांबळे, नगरसेविका शोभा सोमण्णाचे, वाणी जोशी आदींनी विशेष परिश्रम घेतले.