बेळगाव प्रतिनिधी
जैतनमाळ येथे बेकायदेशीर प्रार्थना स्थळ सुरू करण्यात आल्याच्या प्रकरणी आमदार अभय पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. बेकायदेशीरपणे सुरू असलेले हे प्रार्थना स्थळ हटविण्यासाठी त्यांनी दिनांक 5 जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे . शुक्रवारी रात्री सदर जागेवर आमदार आपल्या शेकडो समर्थकांसह गेले असता जैतनमाळ येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या या भागातील खाजगी जागेत कोणतीही परवानगी न घेता ते घराचा नमाजासाठी वापर करत होते. गेल्या वर्षभरापासून रहिवाशांनी याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. दरम्यान, प्रार्थनास्थळी स्पीकर लावण्यात आल्याने रहिवासी आणखी संतप्त झाले.यासंदर्भात बेळगाव तहसीलदार व ग्रामपंचायतींनी नमाजपठणासाठी परवानगी नसल्याचे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील हे हजारो कार्यकर्त्यांसह काल रात्री ११ वाजता जेसीबीसह प्रार्थनास्थळ रिकामे करण्यासाठी गेले होते. यावेळी तेथे असलेल्या पोलिसांनी परवानगी दिली नाही, तसेच वादावादीही झाली.
आमदार समर्थकांनी जेसीबी पुढे जाण्याचा प्रयत्न केला, मात्र एसीपी व डीसीपी यांनी पुढे येऊन त्यांना एकवेळ पोलीस पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत रोखले. यावेळी आमदारांनी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी यावे, असा आग्रह धरला. अखेर घटनास्थळी असलेल्या एसीपींनी परिस्थिती समजावून सांगितल्यावर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त पहाटे ३ वाजता घटनास्थळी आले आणि त्यांनी संवाद साधला.
अखेर त्यांनी ५ जानेवारीपर्यंत जागा रिकामी करावी अन्यथा आम्ही स्वतः पुढील कारवाई करू, असे स्पष्ट केले