आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य चित्रकलेच्या स्पर्धेला लाभला उत्तम प्रतिसाद…
बेळगाव : प्रतिनिधी
चित्रांचे रेखाटन हा बालचमूचा अगदी आवडीचा विषय असतो. त्यामुळे नेहमीच चित्रे काढण्यासाठी आणि रंगांच्या रेषांमध्ये बालवर्ग रमतो. रविवारी व्हॅक्सिन डेपोच्या परिसरात बालचमू अशाच चित्र रंगविण्याच्या सोहळ््यात रमले होते. बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी आयोजित केलेली भव्य चित्रकला स्पर्धा हे याचे विशेष कारण होते. यामध्ये सुमारे दहा हजाराहून अधिक बालचमूने भाग घेतला होता.
दहा हजार कॅलेंडरचे वितरण.
या चिमुकल्यांचे चित्रकृतींचे कॅलेंडर बनवून ते देशातील इतर शाळांना पाठविण्याचा उपक्रम हातात घेण्याचे योजिले आहे. त्यामुळे बेळगावातील स्थानिक बालकांचे कौशल्य देशभर पोचत असल्याचे त्यांनी सांगितले.
दोन गटात स्पर्धा
दोन गटामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते दहावी अशा दोन गटात या स्पर्धा झाल्या
आभार आणि कौतुक
या बालकांच्या पालकवर्गाने या उपक्रमाबद्दल धन्यवाद व्यक्त केले. बालकांच्या चित्रकला कौशल्यासाठी आ. अभय पाटील यांनी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त आणि कौतुक केली.
बालचमूच्या उपस्थितीमुळे व्हॅक्सिन डेपो परिसर गजबजलेला होता. या यासंदर्भात बोलताना आ. अभय पाटील यांनी सांगितले की, या स्पर्धेचे आयोजन मागील 13 वर्षांपासून करण्यात येत आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.