राकासाकोप्पा जलाशयासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगापूजन
बेळगाव
बेळगाव शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या राकासाकोप्पा जलाशयाचा काही भाग पूर्ण भरल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी महापौर, उपमहापौर, सदस्य, आयुक्त आणि महापालिकेचे अधिकारी यांनी गंगा पूजन करून अर्पण केले
गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे राकासाकोप्पा जलाशय भरला आहे. परंपरेप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगापूजन करून बेळगाव शहराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा होईल, अशी प्रार्थना महामंडळाच्या सदस्यांनी केली.
महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, स्थायी समिती सभापती वाणी विलास जोशी, रवी धोत्रे, वीणा विजापुरे, सविता पाटील, सत्तारूढ पक्षनेते राजशेखर डोणी, नगरसेवक अभिजीत जवळकर, नगरसेविका सरिता पाटील,महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, महापालिकेचे सदस्य, इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
.