समुदाय भवन बांधून देण्यासाठी महापौराना निवेदन
बेळगाव:
बेळगांव महानगरच्या महापौर श्रीमती शोभा सोमनाचे यांना गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, व केळकर बाग येथे महानगर पालिकेच्या खुल्या जागेत नागरिकांच्या विनंती अनुसार समुदाय भवन बांधून देण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे.
शहरात महानगर पालिकेच्या खुला जागे आहेत, तिथे कचरा टाकण्यासाठी, गाडी पार्किंग साठी व अतिक्रमण होत दिसत आहे, ह्या जागेत जनतेसाठी अनुकूल करून देण्या साठी समुदाय भवन बांधून दिल्यास तिथल्या जनतेला भरपूर उपयोगी होणार आहे, हे काम पूर्ण झाल्यास गणाचारी गल्ली, गवळी गल्ली, व केळकर बाग येथील नागरिक महापौर शोभा सोमनाचे ह्यांचे ऋणी राहील अशी नमूद केलेली विनंती पत्र सादर करण्यात आला आहे.