छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापुर येथील अ‍ॅक्युप्रेशर’ ट्रीटमेंट पाथ :आ.अभय पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट

छत्रपती शिवाजी महाराज उद्यान शहापुर येथील अ‍ॅक्युप्रेशर’ ट्रीटमेंट पाथ :आ.अभय पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट

बेळगाव:

बेळगाव शहरातील रहिवाशांना  छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात फिरायला जाताना एक नवीन अनुभव मिळेल. शिवाजी उद्यानात सुधारित सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आमदार अभय पाटील यांनी आपल्या आमदार निधीतून ‘अ‍ॅक्युप्रेशर’ थीमवर आधारित ट्रीटमेंट पाथचे सुविधा केले आहे. अ‍ॅक्युप्रेशर रक्ताभिसरणावर कार्य करते आणि शरीराला ताजेतवाने करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील असल्याचं ट्रॅकवरून रोज व्यायाम करतात.

अ‍ॅक्युप्रेशर हे, ‘पंचतत्व’, या निसर्गाच्या पाच घटकांवर आधारित आहे.पृथ्वी, पाणी, वायु, अग्नि आणि आकाश.अ‍ॅक्युप्रेशर’ ट्रीटमेंट पाथ मध्ये या घटकांचे प्रतिनिधित्व केले आहे. पंचतत्व वॉक हा एक वर्तुळाकार ट्रॅक असून तो 7 प्रकारचा पथांनी बनलेला आहे. घटकांमध्ये  मग्नेटिक पाथ ग्रॉस पाथ,एक्यूप्रेशर पाथ , सी संड पाथ , क्रिस्टल पाथ, हायड्रो पाथ , आणि मड पाथ यांचा समावेश आहे. यामध्ये वॉकरला अनवाणी चालावे लागते.

या ट्रॅकवर चालल्यानंतर वॉकरना ताजेतवाने वाटेल, असे आ. अभय पाटील म्हणाले.”गुडघे आणि सांधेदुखी यांसारख्या वयोमानाशी संबंधित समस्यांमुळे लांब अंतर चालू शकत नसलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अधिक फायदेशीर ठरेल,” असेही त्यांनी सांगितले.

या सुविधांचा लाभ घेताना बेळगाव दक्षिणचे नागरिक समाधानी आहेत आणि आ.अभय पाटील यांचे आभार मानतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post रेड सिग्नल जंप करून 2 किमी धावली ट्रेन :दोन कर्मचारी निलंबित
Next post राकासाकोप्पा जलाशयासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही गंगापूजन