बेळगावातील संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेली जमीन देण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती
बेंगळुरू:
बेळगाव दक्षिण आ.अभय पाटील गेल्या कित्येक वर्ष या जमिनी साठी परिश्रम करतायत.या जमिनीवर आयटी पार्क उभारण्याचा त्यांचा स्वप्नं आहे, त्या साठी ते इतके वर्ष पाठपुरावा करत आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना बेळगावमधील संरक्षण विभागाच्या ताब्यात असलेली ७३२.२४ एकर जमीन राज्याच्या ताब्यात देण्याची विनंती केली आहे.
नवी दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी बेळगाव जिल्ह्यातील तुकामट्टी गावातील ७३२.२४ एकर क्षेत्र संरक्षण विभागाच्या ताब्यात असून त्यावर कोणतीही विकासकामे करणे शक्य नाही.विकासाच्या उद्देशाने ही जमीन बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यासाठी संरक्षण अधिकाऱ्यांना योग्य ते निर्देश द्यावेत, असे निवेदन त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्र्यांना दिले.