प्रभाग समिती संघटने कडून अशोक दुडगुंटी यांच्याकडे समिती रचना करण्याची मागणी
बेळगाव :
शहराच्या विकासासाठी आणि कायदेशीररित्या बंधनकारक असलेली प्रभाग समित्यांची रचना त्वरीत करण्यात यावी, अशी मागणी बेळगाव प्रभाग समिती संघटनेने महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे बुधवारी केली.
शहराच्या विकासासाठी प्रभाग समिती आवश्यक आहे याशिवाय कर्नाटक मुन्सिपल कायद्यानुसार स्थापना करणे बंधनकारक आहे. यासाठी आम्ही गेल्या दीड वर्षापासून महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत त्याची दखल घेऊन तत्काळ प्रभाग समितीची रचना करावी अशी मागणी करण्यात आली.
महापालिकेच्या सभागृहात ७ जून रोजी घेतलेल्या आढावा बैठकीत पंधरा दिवसात प्रभाग समित्यांची रचना करु अशी ग्वाही दिली होती. पण, त्यावर अद्याप कार्यवाही झालेली नाही.
महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देत असताना डावीकडून श्री उमेश जमादार, श्री, प्रभाकर कोडकणी, प्रेम चौगुले, प्रमोद गुंजीकर, विशाल गायकवाड, श्री बाळी आणि सर्व वॉर्डचे नागरिक उपस्थित होते.