शास्त्री नगर येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी
बेळगाव:
माननीय आमदार अभय पाटील साहेब यांच्या नेतत्वाखाली. व नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्या पुढाकाराने वॉर्ड क्रमांक 24 येथे डेंग्यू चिकन गुनिया लस घरो घरी जाऊन देण्यात आले.
बेळगांव मध्ये डेंग्यू ची साथ सुरू होण्या पूर्वी खबरदारी म्हणून गिरीश धोंगडी यांनी पुढाकार घेवून हे उपक्रम आ.अभय पाटील यांच्या मार्गदर्शनखाळी बुधवारी 5 जुलै रोजी श्री शक्ती महिला मंडळला सोबत घेवून सुरू केले आणि हे उपक्रम रात्री उशीरा पर्यंत चालू होत, असे धोंगडी यांनी सांंगीतले.
या उपक्रमात रेश्मी कदम, वैशाली पिसे,नीता पिसे , शोभा मोठे , सुषमा सेठ, श्रेया आवटे गीता नरगुंद, रश्मी नरगुंद ,हेमा जगताप , विनायक हवलणाचे व इतर सदस्य उपस्थित होते.
शास्त्रीनगरचे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आणि आ.अभय पाटील आणि नगरसेवक गिरीश धोंगडी यांचे आभार मानले