वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी खुशखबर!!
वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांसाठी खुशखबर!!!
बेळगाव :
वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांसाठीच्या ई-चलनमध्ये पुन्हा 50 टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून यासंबंधी सरकारने एक आदेश जारी केला आहे. याचा फायदा वाहनचालकांना होणार आहे. वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जाते. नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना घरपोच नोटिसा धाडल्या जातात. अनेकजण दंड भरण्याकडे दुर्लक्ष करतात. अशा वाहनचालकांसाठी आता ही योजना फायदेशीर ठरणार आहे.