मनपा स्थायी समित्यांची निवडणूक 27 जून रोजी

मनपा स्थायी समित्यांची निवडणूक 27 जून रोजी

बेळगाव:

बेळगाव महापालिकेची निवडणूक झाल्यानंतरनगरसेवकांचा शपथविधी होण्यास मोठा कालावधी निघून गेला. त्यानंतर अलीकडेच महापौर व उपमहापौर निवडणूक झाली. पुढे स्थायी समित्यांच्या निवडीचा खोळंबा झाला होता. तो खोळंबा आता दूर झाला असून येत्या 27 जून रोजी मनपा स्थायी समित्यांची निवडणूक घेण्याचे निश्चित झाले आहे.

बेळगाव महापालिकेच्या स्थायी समित्यांची निवड येत्या 27 जून रोजी होणार असून तशी माहिती महापालिका आयुक्तांनी लेखी पत्राद्वारे प्रादेशिक आयुक्तांना दिली आहे.त्या पत्राची दखल घेत प्रादेशिक आयुक्तांनी निवडणूक घेण्यास परवानगी दिली आहे. बेळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांचे प्राबल्य आहे.त्यामुळे स्थायी समित्यांच्या अध्यक्षांसह सदस्यांच्या निवडीमध्ये बेळगाव दक्षिणच्या आमदारांसह बेळगाव उत्तरचे आमदार असिफ उर्फ राजू सेठ तसेच माजी आमदार अॅड. अनिल बेनके यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post समाज कंटकाना  तत्काळ अटक करण्याची हिंदू संघटनांन कडून मागणी
Next post शरद पवार , संजय राऊत आणि सुनील राऊत यांना जीवे मारण्याची धमकी.