समाज कंटकाना तत्काळ अटक करण्याची हिंदू संघटनांन कडून मागणी
बेळगाव :
काँग्रेस सरकार येवून एक महिना ही नाही झालं तर समाज कंटक अपले डोके वर काढत आहेत.सोशल मीडियाच्या माध्यमातून हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्यांना तत्काळ अटक करण्याची मागणी बेळगावातील विविध हिंदू संघटनांनी पोलिसांकडे केली आहे.
या संदर्भात हिंदू संघटनांच्या प्रमुखांनी आज एसीपी नारायण बरमनी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. कोल्हापुरात घडलेल्या घटनेप्रमाणे बेळगावात समाजातील शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीचे निवेदन आज विविध हिंदुत्ववादी संघटनांनी एसीपी नारायण बरमनी यांना दिले.
याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना श्री राम सेना व हिंदु राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर म्हणाले की, कोल्हापूर येथील घटनांमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, त्याचप्रमाणे बेळगाव शहरात समीर तहसीलदार, नईम देसाई या तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अवमानकारक पोस्ट टाकून शांतताभंग करण्याचे काम सुरू असून, त्या तरुणांना अटक करून त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.