भाजप कोअर कमिटीची बैठक बंगळूर येथे संपन्न
बंगळूर :
राज्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच बहुचर्चित असलेल्या भाजप उमेदवारी यादीसंदर्भात एका खासगी हॉटेलमध्ये शनिवारी कोअर कमिटीची बैठक उत्साहात पार पडली यावेळी ज्येष्ठ कार्यकर्त्यांची घेऊन मते जाणून घेतली.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजप प्रदेश प्रभारी अरुण सिंह, भाजपचे राष्ट्रीय संघटन सचिव बी.एल. संतोष, मंत्री प्रल्हाद जोशी, शोभा करंदलाजे आदी उपस्थित होते.
राज्यातल्या २२४ विधानसभा मतदारसंघात भाजपचे कोणाला तिकीट द्यायचे, सत्ताविरोधी लाटेचा सामना करणाऱ्यांना तिकीट द्यायचें की नाही, जातनिहाय, प्रदेशनिहाय कल हे सगळे विचारात घेऊन तिकीट जाहीर केले जाईल. निर्णय घेण्यासाठी ४ एप्रिलरोजी नवी दिल्लीत संसदीय पक्षाची बैठक होणारआहे.
तत्पूर्वी,उमेदवारांची निवड यादी प्रदेश भाजप समितीने अंतिम करून केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठवने आवश्यक आहे. त्यानंतर समिती त्याचा आढावा घेईल आणि नंतर तोसंसदीय मंडळाकडे पाठवेल. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी पहिल्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे.
तसेच बचावात्मक रणनीती अवलंबत असलेल्या भाजपने उमेदवारांची यादी तात्काळ जाहीर केल्यास मतभेद निर्माण होऊ शकतात, हे जाणून पहिल्यांदाच नेत्यांची बूथप्रमुखांची मते जाणून घेण्याचा प्रयोग राबवला आहे.तीन इच्छुकांना मते देण्याचा मतदारसंघातील पसंतीची अधिकारबूथप्रमुखांना आहे. सर्वाधिक मते ज्या इच्छुकाला पडतील, त्याला उमेदवारी मिळेल.गेल्या दोन दिवसांपासून कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे.
चाचपणीत सुमारे १८ हजार लोकांनी सहभाग घेतला.तुमकूर व बेळगावसह प्रभागांतील चार उपाध्यक्ष,सचिव,जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष शनिवारच्या बैठकीला उपस्थित होते.