काँग्रेस नेते साधून्नवर यांच्या सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांची धाड
बेळगांव :
काँग्रेस नेते व्ही. एस. साधून्नवर यांच्या राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर आयटी अधिकाऱ्यांनी धाड टाकली.बेळगांव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील सहकारी बँकेवर गोवा विभागाच्या आयटी अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने छापा टाकण्यात आला आहे.
रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. आयटीअधिकाऱ्यांनी बँकेतील सुमारे 265 लॉकर्स ची पडताळणी सुरू आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयटी अधिकाऱ्यांनी लॉकर्स असलेल्या ग्राहकांची चौकशी केली.
कागदपत्र पडताळणीत महत्वाची कागदपत्रे अधिकाऱ्यांच्या हाती लागल्याचेही वृत्त आहे. कित्तूर राणी चन्नम्मा अर्बन क्रेडिट सौहार्द सहकारी बँकेवर छापा पडल्याचे वृत्त समजताच बँकेसमोर ग्राहकांनी एकच गर्दी केली होती.