आ.अभय पाटील यांच्या हस्ते मुक्तांगण विद्यालयाचा भूमिपूजन संपन्न.
बेळगाव : प्रतिनिधी
गोरगरिबांच्या मुला मुलींची शिक्षणाची सोय व्हावी या दृष्टीने प्रयत्न करून आदर्श गुणविकास प्रतिष्ठानने सुरू केलेल्या मुक्तांगण विद्यालयाला चांगले भवितव्य आहे, असे विचार बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी बोलताना व्यक्त केले आणि आमदार फंड मधून 20 लाख देण्याचे आश्वासन दिले.
आदर्श गुणविकास प्रतिष्ठान संचलित मुक्तांगण विद्यालयासाठी येळुर रोड केएलई हॉस्पिटलच्या मागे दोन एकर जागा घेण्यात आली असून तेथे सुमारे दहा कोटी रुपये खर्चून भव्य असे शैक्षणिक संकुल उभा केले जाणार आहे.
त्या संकुलाचा भूमिपूजन आ. अभय पाटील यांच्या हस्ते रविवारी सकाळी संपन्न झाला. कार्यक्रमास पाहुणे म्हणून महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील आणि बुडा चेअरमन संजय बेळगावकर हे उपस्थित होते. तर अध्यक्षस्थानी आदर्श संस्थेचे चेअरमन ए. एल. गुरव हे होते.