मतदारांना वाटण्यासाठी आणलेल्या टिपीन बॉक्ससह साहित्य जप्त…!!कुद्रेमानी गावात अधिकाऱ्यांचा छापा
बेळगाव :
बेळगाव तालुक्यातील कुद्रेमानी गावात रविवारी सायंकाळी ग्रामीण भागातील मतदारांना वाटण्यासाठी भाजप नेत्याच्या घरी जमा करण्यात आलेल्या टिपीन बॉक्ससह काही भेटवस्तू अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची घटना घडली.बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील कुद्रेमानी गावातीलभाजप नेत्याच्या घरी मतदारांसाठी टिपीन बॉक्ससह काही साहित्य जमा करून ठेवण्यात आले होते.मात्र याबाबत खात्रीशीर माहिती मिळताच पोलीस व महसूल व कर अधिकाऱ्यांनी छापा टाकून घरातील टिपीन बॉक्स व काही साहित्य जप्त केल्याचे सांगण्यात येत आहे.या टिपीन बॉक्स आणि साहित्यावर भाजप नेते नागेश मन्नोळकर यांचे चित्र लावण्यात आले आहे. निवडणुका असल्याने ग्रामीण भागातील मतदारांना वितरित करण्यासाठी हे साहित्य जमा करण्यात आले होते.