सरकारी इमारतीला नगरपंचायतीची परवानगी गरजेची नाही

सरकारी इमारतीला

नगरपंचायतीची परवानगी

गरजेची नाही

 

खानापूर (प्रतिनिधी) :

खानापूर शहरातील कोणत्याही सरकारी इमारतीच्या बांधकामासाठी नगरपंचायतीकडून इमारत बांधकामासाठी परवानगीची गरज नाही, अशी माहिती नगरपंचातीच्या अभियंत्याकडून नगरपंचातीच्या स्थायी कमिटीच्या बैठकीत सांगण्यात आले.

सध्या खानापूर शहरात सरकारी हॉस्पिटलच्या बांधकाम सुरू आहे. यावरून बैठकीत चर्चा झाली.खानापूर नगरपंचातीच्या स्थायी कमिटीची बैठक बुधवारी दि. ११ रोजी नगरपंचातीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.

 

बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर होते. व्यासपीठावर नगराध्यक्ष नारायण मयेकर,उपनगराध्यक्षा लक्ष्मी अंकलगी व चीफ ऑफिस आर. के.वटार होते.बैठकीला नगरसेवक रफिक वारेमनी, आप्पया कोडोळी,विनोद पाटील, विनायक कलाल, नगरसेविका राजश्री तोपिनकट्टी, जया बुतकी, सहरा सनदी आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रेमानंद नाईक यानी केले. तर चीफ ऑफिसर आर. के. वटार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Previous post नाटू नाटू’ आरआरआरमधील गाण्यानं पटकावला गोल्डन ग्लोब पुरस्कार
Next post 31 ರಂದು ಪಾಲಿಕೆ ಮೇಯರ್ ಚುನಾವಣೆ.