ईद-ए- मिलाद मिरवणुकीनंतर रुक्मिणीनगर येथे तलवार फाईट….
बेळगाव :
बेळगाव शहरातील ईद-ए- मिलाद मिरवणुकीनंतर रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाचीचे पर्यवसान हाणामारी व तलवार हल्ल्यामध्ये होऊन त्यात चौघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली.
तलवार हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांची नावे मोहम्मद कैफ, साहिल बंडारे, तन्वीर व अहमद अशी आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की काल शहरांमध्ये आयोजित ईद-ए-मिलाद मिरवणूक आटोपून घरी परतणाऱ्या रुक्मिणीनगर व उज्वलनगर येथील युवकांच्या दोन गटांमध्ये क्षुल्लक कारणावरून बाचाबाची झाली.
पुढे या बाचाबाचीचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. त्यावेळी एका गटातील – युवकांनी तलवारीने दुसऱ्या गटातील युवकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात उपरोक्त चौघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या मानेला आणि पोटाला गंभीर दुखापत झाली आहे.